आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Chandrakant Patil's Warning To Stop The Party Leaders And Go To The Party Office, Pankaja Munde Supporters Will Get In Trouble

चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेंना ताकीद:समर्थकांना सांभाळा, अन्यथा तुमच्या राजकीय कारकिर्दीला फटका बसेल; अशा गोष्टी सहन करणार नाही

कोल्हापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागवत कराडांच्या कार्यालयावर चाल करून जाणारे आणि प्रविण दरेकर यांचा ताफा अडवणारे जर पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्या आगामी कारकिर्दीला यामुळे फटका बसू शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. यापुढे संघटनेत अशा गोष्टी सहन करणार नाही. त्यांनी आपल्या समर्थकांना समजून सांगावे अशा कडक शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना समज दिली.

ते कार्यकर्ते नेमके कोण?

भागवत कराडांच्या कार्यालयावर चाल करून जाणारे आणि प्रविण दरेकर यांचा ताफा अडवणारे कार्यकर्ते नेमके कोण? असा सवालही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

अनेक अपक्ष आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना विधान परिषदेला भाजपला मतदान करू असे सांगितले आहे. यावेळी ओपन मतदान होते यामुळे यावेळी मतदान करता आले नाही, मात्र येणाऱ्या निवडणुकीत भाजपला साथ देणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मविआला महाराष्ट्रात सत्ता असताना ती नीट संभाळता येत नाही, आणि ईडी हातात असती तर देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केले असते, असे म्हणाऱ्यांना नाचता येईना अन् अंगण वाकडे अशी महाविकास आघाडीची परिस्थिती आहे. मविआ सरकार विरोधी आमदारांना रुपया देत नाही, आणि मोठ मोठ्या गप्पा मारते असा टोला त्यांनी लगावला आहे. नुसत्या घोषणा करणारे हे सकार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीसरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. त्यांचा काही फायदा झाला नाही. या विरोधात मी हायकोर्टात जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आमदारांची नाराजी भोवली - पाटील महाविकास आघाडी सरकारला राज्यसभा निवडणुकीत आमदारांची नाराजी भोवली आहे. यातील काही नाराज आमदार म्हणाले की मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाही. काही आमदार म्हणाले आम्हाला घोडे म्हणताय आमचा अपमान करताय आम्हीही यांना दाखवून देऊ आणि यामुळेच त्यांचा पराभव झाला असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढणार धनंजय महाडिक यांच्या रुपाने भाजपची ताकद वाढली आहे. 3 जिल्ह्यात त्यांचे तगडे नेटवर्क आहे, त्यांनी उमेदवारी मागितली नव्हती माद्ध त्यांच्या कामाच्या आणि जनसंर्पंकाने पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळकटी मिळाली आहे. आगामी निवडणुकीत सर्व चित्र बदललेले दिसेल असे म्हणत आगामी सर्व निवडणुकीत भाजपचा विजय होणार आहे. महाविकास आघाडीने अडीच वर्षांत सत्तेचा माज काय असतो हे पाहिले, आणि त्यामुळे जनता बदल घडवेलच असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त् केला आहे. भाजपला कधीही सत्तेचा गर्व नाही, मात्र भाजप जनसेवेसाठी आणि विकासासाठभ् नेहमी तयार आहे.

पंकजा मुंडेंना सुनावले

भागवत कराडांच्या कार्यालयावर हल्ला करणारे नेमके कोण आहे. हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र जर पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जर प्रविण दरेकर यांचा ताफा अडवला असेल आणि कराडांच्या ऑफीसवर हल्ला केला असेल तर पंकजा मुंडेंच्या आगामी कारकिर्दीला यामुळे फटका बसू शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे. यापुढे संघटनेत अशा गोष्टी सहन करणार नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना समजून सांगावे असेही त्यांनी अगदी कडक शब्दांत पंकजा मुंडेंना सुनावले आहे.

बातम्या आणखी आहेत...