आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:'अशोक चव्हाण यांची परिस्थिती म्हणजे 'गिरे फिर भी टांग उपर'; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्याचे राज्यात आता पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. यातच न्यायालयाच्या निर्णयाला भाजपने महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. ''अशोक चव्हाण यांची परिस्थिती 'गिरे फिर भी टांग उपर' अशी आहे'', अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाना साधला.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'स्थगितीऐवजी प्रकरण घटनात्मक खंडपीठाकडे प्रकरण गेले असते, तर हा सरकारचा नैतिक विजय झाला असता. पण, याप्रकरणी नैतिक विजय झाला असे अशोक चव्हाण यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. घटनामत्मक खंडपीठाकडे हे प्रकरण गेल्याने आता हा खटला 30 ते 40 वर्षे चालेल', अशी प्रतिक्रीया पाटील यांनी व्यक्त केली.

0