आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले; तुम्ही खुशाल गुन्हे दाखल करा, आम्ही घाबरत नाही- चंद्रकांत पाटील

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत

पोलिसांकडून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी झाली. यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्यावरुन भाजप नेत्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले. तुम्ही पण खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळेच राज्य सरकार सर्व काही केंद्रावर ढकलत आहे. कोरोना काळात सत्ताधाऱ्यांनी असे राजकारण करणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी रोज खोटे आरोप करणे थांबवावे. दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या केसेस दाखल करताय. खुशाल गुन्हा दाखल करा. आम्ही घाबरत नाही. अनिल देशमुखही धमक्या देत देतच गेले, असा टोलाही यावेळी पाटील यांनी लगावला.

काय म्हणाले होते दिलीप वळसे पाटील ?

शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन मोठा राजकीय गोंधळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप लावला आहे. आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आज ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला. हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...