आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Cheap Grain Wheat And Rice From Aundha Nagnath To Nanded Seized, Wasmat Rural Police Performance, Tempo Driver Arrested

हिंगोली:औंढा नागनाथ येथून नांदेडकडे काळ्याबाजारात जाणारे स्वस्त धान्याचा गहू अन तांदूळ पकडला, वसमत ग्रामीण पोलिसांची कामगिरी, टेम्पो चालक ताब्यात

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंध्रप्रदेशात नेले जात होते धान्य

औंढा नागनाथ येऊन नांदेडकडे काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा स्वस्त धान्याचा ११० क्विंटल गहू अन तांदूळाचा टेम्पो वसमत ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी ता. २४ दुपारी साडेतीन वाजता पकडला आहे. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले असून त्याने धान्य औंढा नागनाथ येथून भरण्यात आल्याचे चालकाने सांगितले. महेबुब बेग (ता. तळेगाव, ता. उमरी, जि. नांदेड) असे चालकाचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथकडून एका टेम्पो मध्ये स्वस्त धान्याचा गहू व तांदूळ नांदेडकडे नेला जाणार असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर शिंदे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने आज दुपारी दोन वाजल्यापासून औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर बोराळा पाटी जवळ वाहनांची तपासणी सुरु केली.

दरम्यान, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक टेम्पो थांबविला. त्यानंतर पोलिसांनी चालक महेबुब बेग (रा. तळेगाव, ता. उमरी,जि. नांदेड) याच्याकडे चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांच्या प्रश्‍नाच्या सरबत्तीने त्याला उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यास टेम्पोसह (क्र.एमएच २६-एडी-२०८२) ताब्यात घेऊन वसमत ग्रामंीण पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी टेम्पोमधील पोत्यांची पाहणी केली असता त्यात ३० क्विंटल गहू व ८० क्विंटल तांदूळ आढळून आला. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केली असता हे धान्य औढा नागनाथ येथून भरल्याचे त्याने सांगितले तसेच हे धान्य नांदेडकडे नेले जात असल्याचेही त्याने प्राथमिक चौकशीत सांगितले. पोलिसांनी धान्य व टेम्पो असा ९.५० लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात चालक महेबुब बेग याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून त्याची अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आंध्रप्रदेशात नेले जात होते धान्य
या संदर्भात सुत्रांच्या माहितीनुसार हे धान्य औंढा येथून थेट आंध्रप्रदेशात नेले जात असल्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असून सदर धान्य कोणत्या स्वस्त धान्य दुकानदाराचे होते, धान्य कुठून घेण्यात आले. नांदेड जिल्हयातून धान्य कोणी आणावयास सांगितले याची माहिती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...