आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपवर हल्लाबोल:'इथे गोमाता म्हणता आणि तिकडे गोव्यात जाऊन तेच खाता, हे कसले हिंदुत्व?'- छगन भुजबळ

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाना साधला. 'गोमाता म्हणता आणि गोव्यात जाऊन तेच खाता? हे कसले हिंदुत्ववादी?', असा सवाल छगन भुजबळांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारला.

नाशिकमध्ये बोलत असताना छगन भुजबळ म्हणाले की, 'मंदिरे उघडले नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी चुकीची आहे. फक्त भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का ? इतरांना सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही?, असा सवाल करताना दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंदिरांबाबत निर्णय घेणार असल्याचेही भुजबळांनी सांगितले की. तसेच, दिवाळीत फटाके न वाजवण्याचे आवाहनही भूजबळांनी यावेळी केले. 'राज्यात फटाक्यांवर बंदी नाही. पण, फटाक्यांचा धूर कोरोनाग्रस्तांसाठी हानीकारक ठरू शकतो, फटाके वाजवू नयेत, असे आवाहनही भुजबळांकडून करण्यात आले.