आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'आरएसएस' संघटनेवर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. करू नये, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुण्याच्या 'डीआरडीओ'चे संचालक व तत्कालीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाॅब्लिस्ट (इंजिनिअर्स आर अँड डीई) प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी आपले परखड मत व्यक्त केले.
प्रदीप कुरुलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याची चर्चाय. त्यांच्याविरोधात पुण्यात आंदोलन झाले. अनेक राजकीय नेते सुद्धा त्यामुळे 'आरएसएस'वर आरोप करत आहेत. मात्र, यावर छगन भुजबळ यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
'आरएसएस'वर आरोप का?
'डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला गोपनीय माहिती पुरवली. या प्रकरणी त्यांना एटीएसने अटक केली आहे. या कुरुलकर यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यावरून अनेकांनी 'आरएसएस'वर आरोप करायला सुरुवात केली आहे.
काय म्हणाले भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, 'आरएसएस' संघटनेवर कोणी देशद्रोहाचा आरोप करू शकत नाही. करू नये. मात्र, 'आरएसएस'मध्ये आहे, असे सांगून असे जे काही धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यावर 'आरएसएस'ने नजर ठेवली पाहिजे. पोलिस, गुप्तहेर शाखांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कोण कधी, अशा काही हनी ट्रॅपमध्ये सापडेल सांगता येत नसल्याचेही ते म्हणाले.
जोपर्यंत नेते एकत्र...
छगन भुजबळ म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जोपर्यंत एकत्रित आहेत. तोपर्यंत कोणी काही बोलले, तर त्याकडे फार लक्ष द्यायचे कारण नाही. आपल्या नेत्यांनी ज्या प्रमाणे ठरवले आहे, त्याप्रमाणे खालच्या लोकांना काम करायचे आहे. त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकू नयेत. तसेच एकनाथ शिंदे सरकारने अवकाळी पावसाची नुसती पाहणी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात ठोस रक्कम पडली पाहिजे. याच्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
संबंधित वृत्तः
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.