आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर आवाहन:'माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल तर...' संभाजीराजेंचे मराठा तरुणांना आवाहन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावं, मरून जगावं" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे

वैद्यकीय शाखेतील प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने आणि मराठा आरक्षणासाठी बीड तालुक्यातील केतुरा येथील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यानंतर आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा तरुणांना आत्महत्येचा पर्याय न निवडण्याचे आवाहन केले आहे.

संभाजीराजेंनी तरुणांना आत्महत्या करू नयेत असे आवाहन केले आहे. तसेच तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? असंही त्यांनी विचारले आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या केली. या घटनेवर त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

संभाजीराजे म्हणाले की, 'एक लक्षात ठेवा हा समाज, "लढून मरावे, मरून जगावे" हेच आम्हाला ठावं, असे पोवाडे गाणारा आहे. माझ्या शूर सरदारांनो खचून जाऊ नका. आज परिस्थिती जरी आपल्या विरोधात वाटत असली, अंधारात जात असलेली वाटत असली तरी, उद्या नक्की पहाट होईल. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच!'

चिठ्ठी व्हायरल
विवेकच्या आत्महत्येनंतर समाज माध्यमांवर एक सुसाईड नोट व्हायरल झाली आहे. यात आपण मराठा सामजाला आरक्षण नसल्याने वैद्यकीय प्रवेशाला पात्र ठरत नसल्याने समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.