आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद- छत्रपती उदनयराजे भोसले

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल म्युजियमचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय करण्याचा निर्णय घेतला आहे. अदित्यनाथ आग्रा, फिरोजाबाद, मथुरा येथील विकास कामे आणि कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी म्युजियमचे नाव बदलण्याची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, 'मुघल आपले नायक कसे असू शकतात...? छत्रपती शिवाजी महाराज आपले खरे हिरो आहेत.'

याच पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याचे वंशज आणि भाजप खासदार उदनयराजे भोसले यांनी आपली प्रतिकिया दिली. त्यांनी ट्वीट केले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. त्यांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या आग्रा नगरीत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे मनपासून अभिनंदन...'

देवेंद्र फडणवीस आणि कंगना रनोटने केले समर्थन

म्युजियमचे नाव बदलण्याचा निर्णयाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेत्री कंगना रनोटने समर्थन केले आहे. फडणवीस यांनी अदित्यनाथ यांच्या ट्वीटला रिट्वीट करुन,'।। जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय !' असे लिहीले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser