आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Eknath Shinde's Revolt In Shiv Sena: Chief Minister Thackeray Stopped Important Decisions Of Eknath Shinde, File Is Not Approved, So Shinde Is Aggressive

का झाले एकनाथांचे बंड?:शिंदेंच्या महत्त्वाच्या निर्णयांना मुख्यमंत्री ठाकरेंचा चाप; फाइल्स अडवल्या, फडणवीसांची मैत्री खुपली

विनोद यादव / मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीनंतर नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड एका रात्रीतून घडले नाही. या बंडाची बिजे राज्यसभा निवडणुकीच्या आधीपासून रुजली. सतत नाना स्तरावर होणारी कोंडी, त्यांच्या निर्णयांत हस्तक्षेप, फाइल नामंजूर करणे ते शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर जाण्याची कारणे दडली आहेत. त्याचा घेतलेला वेध.

महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन लोटस सुरू झाले असून, त्यासाठी शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा बिगुल वाजवला आहे. खरे तर समृद्धी द्रुतगती मार्ग प्रकल्पादरम्यान एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात घट्ट राजकीय मैत्री निर्माण झाली. त्याच मैत्रीतून पुढे शिंदे यांच्यावरील उद्धव यांची नाराजी वाढली. कारण एकनाथ शिंदे यांचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले चांगले संबंध शिवसेनेच्या नेत्यांना सुरुवातीपासूनच आवडले नाहीत.

मंत्र्यांनी लावली फिल्डिंग

खरे तर फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी एक्स्प्रेस वेमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपला घेरायचे होते. शिवसेनेला यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करायचा होता. फडणवीस अडकल्यावर शिंदेही अडकण्याची भीती होती. कारण ते कॅबिनेट मंत्री असताना हा प्रकल्प सुरू झाला होता. यानंतर संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यास सुरुवात केली.

मुंबई 'डीपीआर'चा निर्णय

देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा डीपी तयार करताना एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री म्हणून काही निर्णय घेतले. हे निर्णय नंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या सचिवांमार्फत थांबवली. एकनाथ शिंदे यांना काही IAS आणि ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी नेमायचे होते. मुख्यमंत्र्यांनीही हे होऊ दिले नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना पहिल्या क्रमांकाचे राजकीय स्थान असतानाही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्व देण्यात आले.

अनेक फाइल अडवल्या

एकनाथ शिंदे यांच्या खात्याच्या फाइल्स मुख्यमंत्री सतत अडवून ठेवत होते. शिंदे त्यांना भेटायला आले, तर त्यांना खूप वाट पाहावी लागायची. दुसरीकडे शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर गेल्याने एकनाथ शिंदेही संतापले होते. शिंदे यांना ठाणे महापालिका निवडणूक एकट्याने लढवायची होती, तर संजय राऊत यांच्यासह काही नेते त्यांच्यावर राष्ट्रवादीसोबत लढण्यासाठी दबाव आणत होते. या राजकीय मुद्द्यांमुळे संतप्त झालेल्या एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी (मविआ) सरकारचा पाठिंबा कमी होत असल्याचे पाहून बंड केले.

फडणवीस दिल्लीला का?

शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी फडणवीस यांनी दिल्ली गाठली. महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यास त्यांना एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मान्यता घ्यायची आहे. जेणेकरून राज्यात भाजपचे सरकार स्थापनेत कोणताही राजकीय अडथळा येऊ नये. याशिवाय शिंदे यांच्यामुळे मुंबई, ठाण्यासह 14 महापालिकांमध्ये भाजपला किती राजकीय फायदा झाला, याचीही माहिती पक्षश्रेष्ठींना द्यायची आहे. शिंदे यांचे पुत्र श्रीकांत एकनाथ शिंदे हे कल्याणमधून खासदार आहेत. त्यांना केंद्रात काही जबाबदारी देता येईल का? या पर्यायावर फडणवीसांना दिल्लीत पक्षाशी चर्चा करायची आहे.

बंडखोर गुजरातमध्ये का?

गुजरातची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. सूरत शहर मुंबईपासून तीन-चार तासांच्या अंतरावर आहे. याशिवाय गुजरात भाजपचा मजबूत बालेकिल्ला आहे. याच कारणामुळे ऑपरेशन लोटससाठी गुजरातची निवड करण्यात आली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले असते, तर शिवसैनिकांनी त्यांची तोडफोड करून सुटका केली असती. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार असल्याने त्यांना येथे ठेवणे धोक्याचे होते.