आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना-शिवसेना वाद:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तुलना रावणाशी, अभिनेत्री कंगना रनोटचे नवे वादग्रस्त ट्वीट

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना रनोट आता नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. आधी तिने आपले ऑफीस तोडण्यासाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना बाबराची सेना म्हटले होते. त्यानंतर आता तिने थेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची रावणाची तुलना केली आहे. कंगनाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, त्यात तिने स्वतःला राणी लक्ष्मीबाई आणि उद्धव ठाकरेंना रावण दाखवले आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून कंगनाचे ऑफीस अनधिकृत असल्याचे सांगत पाडण्यात आले. त्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्वीटद्वारे निशाना साधला. याआधी तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता, यावरुन अनेकांनी तिच्यावर टीका केला होती. त्यानंतर आता तिने मुख्यमंत्र्यांची रावणाशी तुलना केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ट्वीटमध्ये कंगना म्हणाली की, "हा फोटो मला विवेक अग्नीहोत्रीने पाठवला आहे. हा फोटो पाहून मी खूप भावनिक झाले. लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन जय हिंद, जय महाराष्ट्र"

बातम्या आणखी आहेत...