आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वीर जवान तुझे सलाम:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 26/11 हल्ल्यातील शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांसह भगतसिंह कोश्यारी, अनिल देशमुख यांनीही आदरांजली वाहिली

मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात पोलिस आणि जवान मिळून 18 जणांना वीरमरण आले होते. तसेच, 166 सामान्य नागरिकांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शहीदांना आदरांजली वाहिली. तसेच, हुतात्मा दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शहीदांना आदरांजली वाहिली.

कोरोना संकटमामुळे यंदा शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी ठराविक लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. यावेळी शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबीयांनीही येथे येऊन श्रद्धांजलीही दिली. यादरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहीदांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

पोलिस दलानेही ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

"त्यांचे बलिदान कधीही विसरु शकणारन नाहीत. आज आम्ही आमच्या तारणकर्त्यांना श्रद्धांजली वाहतो," असे मुंबई पोलिसांनी ट्विट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्वीटरवरुन शहीदांना आदरांजली अर्पण केली. 'मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या पोलीस व सुरक्षा दलातील सर्व शहीदांना विनम्र आदरांजली. या हल्ल्यात आपल्या जवळच्या व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांप्रती आज संवेदना व्यक्त करताना दहशतवादाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करूया,' असे ट्वीट पवारांनी केले.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. 'मुंबईवर भ्याड दहशतवादी हल्ला परतावून लावताना शहीद झालेल्या भारतमातेच्या थोर सुपुत्रांना, सर्व वीरपुत्रांना कोटी कोटी नमन... ' असे फडणवीस म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser