आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Chief Minister Uddhav Thackeray Will Take A Decision About Lockdown In The Next Two Days; Relief And Rehabilitation Minister Vijay Vadettiwar's Big Statement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात कडक लॉकडाउन ?:येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील; मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे मोठे विधान

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांचाच अंदाज चुकवला

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण, परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाहीये. यातच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कडक लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत.सध्या असलेल्या कडक निर्बंधांचा कालावधी वाढेल किंवा कडक लॉकडाऊन लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसात निर्णय घेतील, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, 'लॉकडाऊन काळात लोकांना मदत करण्याबाबत आढावा घेण्यात आलाय. पुढच्या आठवड्यापर्यंत सर्व घटकांना मदत मिळाली पाहिजे. राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावायचा, का सध्याचे निर्बंध आणखी वाढवायचे, याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेतील.

ते पुढे म्हणाले की, 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या सर्वांचा अंदाज चुकवला. वाटल होतं, लाट सौम्य येईल पण ही लाट तीव्र निघाली. कोणालाच याची कल्पना नव्हती. तिकडे, दिल्लीने कडक लॉकडाउन केलाय. त्या लॉकडाऊनचा आढावा आम्ही घेत आहोत. दिल्लीच्या लॉकडाउनचे काय स्वरुप आहे? लोकलसंबंधी काय निर्णय घेतला आहे? अत्यावश्यक सेवांना काय सूट दिली आहे? ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर स्वरुप ठरवून नंतर घोषणा करण्याचा आमचा विचार आहे. येत्या दोन दिवसांत कडक लॉकडाउनसंबंधी निर्णय अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील,' असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...