आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे उत्तर:नितीनजी, तुम्ही बोलता खूप प्रेमाने मात्र पत्र कठोर; जनतेच्या विकासकामांच्या आड कुणालाही येऊ देणार नाही- मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्राची बरीच चर्चा झाली. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आवर घाला असे सांगणारे हे पत्र होते. नितीन गडकरींनी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले होते.

या पत्रावर आता उद्धव ठाकरेंनी उत्त दिलं आहे. नागपूर मेट्रो स्टेटशच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी गडकरींना ग्वही दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
नितीन गडकरींच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही बोलता फार प्रेमाणे, पण पत्र कठोर लिहिता. असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गडकरींना उत्तर दिले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की जरी हलक्या-फुलक्या मूडमध्ये म्हटले असले तरीही एक वचन नक्की देतो की विकासकामांच्या आड कुणीही येणार नाही. मी कुणालाही विकासकामांच्या आड येऊ देणार नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही तत्पर आहोत. असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

काय होतं नितीन गडकरींच्या पत्रात?
केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं माझ्या निर्दशनास आलेलं आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडत आहे’, असं गडकरींनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे. तर कामात अडथळा आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कमे मंजूर करण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही नितीन गडकरींनी आपल्या पत्राद्वारे दिला.

बातम्या आणखी आहेत...