आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकाऱ्यांना कोरोना:महाराष्ट्राच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण, फोर्टीस रुग्णालयात दाखल

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या अनलॉक-2 सुरू आहे, तरीदेखील कोरोना रुग्णांची संख्या दररोज पाच हजारांच्या घरात जात आहे. कोरोनाविरोधात लढणाऱ्या यंत्रणेत देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर, आता राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सध्या डॉ. ओक यांच्यावर मुंबईतील फोर्टिस रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. ओक यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर सोमवारी मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर ट्रिटमेंट करणारे डॉ. राहुल पंडीत यांनी सांगितले की, डॉ. ओक यांना ऑक्सीजन सपोर्टवर ठेवले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 12 एप्रिल रोजी कोव्हिड-19 टास्क फोर्सची घोषणा केली होती. कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत अभ्यास करून सूचना देण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. यात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा समावेश असून डॉ. संजय ओक हे या टास्कचे प्रमुख आहेत.

बातम्या आणखी आहेत...