आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचे लसीकरण:भारत बायोटेकच्या लसीची लहान मुलांवर चाचणी सुरू; पन्नास मुलांना देणार लसीची पहिली मात्रा

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तब्बल 208 दिवस चालणार संपूर्ण प्रक्रिया

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीला नागपुरात रविवारपासून सुरुवात झाली आहे. देशभरात दिल्ली, पाटणासह नागपुरातील मेडिट्रीना या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवरील कोरोना लसीची ट्रायल चालणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांना पहिला डोस दिला जाणार आहे. रविवारी ५० च्या जवळपास लहान मुले पालकांसोबत आली होती. त्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. देशातील कोरोना संक्रमण आता लहान मुलांतही वेगाने फैलावत आहे.

तिसऱ्या लाटेत तर लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेत देशातील लहान वयोगटाला सर्वात जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारत बायोटेक कंपनीने लहान मुलांसाठी (२ ते १८ वर्षे) कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोव्हॅक्सिनच्या क्लिनिकल चाचण्या करण्याची शिफारस केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या कोविड-१९ बाबतच्या सबजेक्ट एक्स्पर्ट कमिटीच्या तज्ज्ञांनी केली आहे.

दिल्लीमध्ये एम्स रुग्णालयात, बिहारमधील पाटणा येथील एम्स रुग्णालयात आणि नागपूरमधील मेडिट्रीना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या ठिकाणी ही “क्लिनिकल चाचणी’ घेण्यात येत आहे. एकूण ५२५ जणांवर या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. मुलांवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्यांना लस देण्यात येणार असून याबाबतचे नियोजन सुरू आहे.

तब्बल २०८ दिवस चालणार संपूर्ण प्रक्रिया
संपूर्ण प्रक्रियेत लसीकरण होणाऱ्या लहान मुलांचे सर्व समुपदेशन करण्यात आले आहे. यात त्याची प्रकृती सुदृढ आहे की नाही या अनुषंगाने तपासणी करण्यात आली आहे. रविवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यासोबत अँटिबॉडीचीसुद्धा तपासणी करण्यात आली. ही चाचणी प्रक्रिया २०८ दिवस चालणार असून या प्रक्रियेची पूर्ण माहिती देऊन लहान मुलांना सहभागी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...