आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची घोषणा:चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबरला होणार उद्घाटन, नारायण राणेंची महत्त्वपूर्ण घोषणा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज कोकणासाठी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ बांधून तयार आहे, विमान वाहतूक सुरु करण्यासाठी येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणेंनी चिपी विमानतळाच्या उदघाटनाचा मुहूर्त सांगितला आहे. मी स्वतः दिल्लीहून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत दिल्लीहून मुंबई आणि मग रत्नागिरी असा प्रवास करुन चिपी विमानतळावर पोहोचू आणि चिपी विमानतळाचे उद्घाटन करु असे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

विमानतळाच्या उद्धाटनासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आहेत. मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही, असं राणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...