आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळाच्या धावपट्टीवर आला कोल्हा:चिपी विमानतळावर कोल्ह्याने रोखले लँडिंग, दहा मिनिटे विमानाच्या आकाशात घिरट्या, प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण

सिंधुदुर्ग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आले आणि या विमानतळावरुन विमान सेवा सुरु झाली. पण, नव्याने सुरु करण्यात आलेल्या या विमानतळावरील एका घटनेमुळे दहा मिनिटांसाठी विमानाचे लॅन्डिंग रखडले होते. एका घटनेमुळे या विमानतळावर विमानाला लॅन्डिंग करण्यासाठी दहा मिनीटे आकाशात घिरट्या घालव्या लागल्या आहे.

मुंबईवरून आलेले विमान चिपी विमानतळावर उतरणार होते. त्याचदरम्यान मात्र धावपट्टीवर अचानक कोल्हा आल्याने विमानाला चक्क दहा मिनिटे आकाशातच घिरट्या घालावे लागले. विमान लॅन्डिंग करणार होते मात्र अचानक अवकाशात झेपून घिरट्या घालत असल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिपी विमानतळावर मुंबईहून आलेले विमान लॅन्डिंग करत होते. त्यादरम्यान धावपट्टीवर अचानक कोल्हा दिसल्याने, पायलटने तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले. त्यानंतर विमानतळावरील यंत्रणेला धावपट्टीवर आलेल्या कोल्हाला बाहेर काढण्यास सांगितले. कोल्ह्याला बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान चिपी विमानतळावर उतरले.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचा कळप आहे आणि हे कोल्हे आपल्या भक्षकासाठी फिरत असतात. दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला आहे.

बातम्या आणखी आहेत...