आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलापुरात वायुगळती:नागरिकांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास; नोबेल इंटरमीडिएट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही घटना रात्री सुमारे 10:20 वाजण्याच्या सुमारास घडली.

बदलापूर येथील एमआयडीसी भागात वायुगळती झाल्याने शिरगाव आपटेवाडी या परिसरात 3 किमीच्या परिघात लोकांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. वायुगळतीमुळे काहींना उलट्या आणि खोकल्याचा त्रास देखील जाणवत आहे. मात्र ही वायुगळती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. ही घटना रात्री सुमारे 10:20 वाजण्याच्या सुमारास घडली.

बदलापूर पूर्व MIDC भागातील एका केमिकल प्लांटमध्ये वायू गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला कळताच त्यांनी तात्काळ कारवाई करत सदर कंपनीमध्ये जाऊन वायू गळतीचे कॉक बंद करण्यात आले असल्याची माहिती दिली. मात्र या वायुगळती मुळे लोकांना उलच्या आणि श्वसनाचा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी देखील पुढे आल्या आहेत. एमआयडीसी भागातील नोबेल इंटरमीडिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून ओव्हरहीटमुळे ही वायूगळती झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये एका रिॲक्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आणि बेंझाईन डिहायड्रेड या दोन केमिकल्स मिश्रण सुरू होतं. मात्र त्यासाठी लागणारा तापमान नियंत्रित करताना चूक झाल्याने या रिॲक्टरमधून वायुगळती झाली. मात्र हा वायू ज्वलनशील नाही. असे असले तरी हा वायू श्वास घेण्यास त्रासदायक ठरणारा असून त्वचा, डोळे,यांना काही प्रमाणात बाधा करणारा आहे.

बातम्या आणखी आहेत...