आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:राज्यातील कीर्तनकारांना कोरोनाकाळात मोठा दिलासा, राज्य सरकार महिन्याकाठी देणार 5 हजारांचे मानधन

पंढरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील 10 कलावंतांना मोठा दिलासा

राज्य सरकारने कोरोना काळात कीर्तनकारांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्यातील वारकरी संप्रदायात येणाऱ्या कीर्तनकार, गायक, प्रवचनकार, वादक यांना महिन्याकाठी 5 हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. कोरोनाकाळात राज्यातील 48 हजार कलावंतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. वारकरी संप्रदायातील अनेक लोक याकाळात बेरोजगार झाली, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी यापूर्वी कीर्तनकारांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडे वारंवार मागणी केली होती. या निर्णयामुळे राज्यभरातील कलावंतांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील 10 हजार कलावंतांना मोठा दिलासा
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 10 कलावंतांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले असून यामध्ये कलावंतांची देखील मोठी संख्या आहे. कोरोनाकाळात राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ बंद असल्याने याचा मोठा परिणाम या वर्गावर पडला होता. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. अनेक कलावंतांना उपासमारीचा सामनादेखील करावा लागला होता. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय खूपच महत्वाचा मानला जात असून या निर्णयाचे सर्वच स्तरांतून कौतूक केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...