आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा चिपळूण दौरा:मुख्यमंत्री म्हणाले - लोकप्रियता मिळवण्यासाठी आताच घोषणा करणार नाही; राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसान भरपाईची घोषणा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिपळूणमध्ये वीज खंडीत झाल्याने 8 जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असल्याने मुसळधार पावसाने अनेक शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत व बचावकार्य वेगाने सुरु असून पावसामुळे यात अडचण येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुसऱ्या दिवशी चिपळूण दौऱ्यावर आले होते. ते आता चिपळूणमध्ये दाखल झाले आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. मदत व बचावकार्याची पाहणी करत त्यांनी नुकसानग्रस्त लोकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव आदी उपस्थित होते.

चिपळूण येतील पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • चिपळूणच्या पूरग्रस्त भागाची मी आज पाहणी केली आहे, नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून बोललो आहे. काल मी रायगड जिल्ह्यातल्या तळिये गावामध्ये देखील जाऊन आलो, आपत्तीची अंगावर काटा येईल अशी दृश्ये आहेत.
  • उद्या मी पश्चिम महाराष्ट्राचाही आढावा घेत आहे, तेथे देखील पुराचे मोठे संकट आहे. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही.
  • राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसान भरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल असे ते म्हणाले.
  • ते पुढे म्हणाले की, मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचनादेखील प्रशासनाला केल्या आहेत.
  • केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. याविषयावर पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहे.
  • नागरिकांना पाऊस, पूर, पाणी नवीन नाही परंतु, या वेळेला जे झालं ते अकल्पित होतं आणि पाणी झपाट्याने वाढल्यामुळे त्यांना आपले सामान आणि वस्तूदेखील वाचवता आल्या नाहीत. यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहेत.

तातडीची मदत लगेच मिळणार
दोन चार दिवसांमध्ये राज्यातील पूर परिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल. मात्र आता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडे-लत्ते व इतर आवश्यक त्या गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत सबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत
असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाईल
राज्यातील वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करण्यासाठी काम केले जाईल.

चिपळूणमधील सध्याची परिस्थितीचा आढावा घेत आहे मुख्यमंत्री
चिपळूणमधील सध्याची परिस्थितीचा आढावा घेत आहे मुख्यमंत्री

मुख्यमंत्री गुहागरमध्ये दाखल
चिपळूणची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच गुहागरमध्ये दाखल झाले आहे. ते आता वाहनाने चिपळूणकडे रवाना झालेले आहेत. साडेबारा वाजेच्यादरम्यान मुख्यमंत्री चिपळूणमध्ये पोहोचतील. त्यानंतर तेथील मदत बचावकार्याची पाहणी करत काही घोषणा करण्याची शक्यता आहे. दुपारी अडीच वाजता ते पुन्हा आपल्या हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

चिपळूणमधील सध्याची परिस्थिती
चिपळूणमधील सध्याची परिस्थिती

चिपळूनमध्ये वीज खंडीत झाल्याने 8 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराला चहू बाजूंनी घेरले होते. त्यामुळे शहरात पाणीच पाणी साचले होते. चिपळूनमधील अपरांत हॉस्पीटलमध्ये पुराचा पाणी शिरल्याने 8 जणांचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काही घोषणा करतात याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...