आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • CM Uddhav Thakeray Live, News And Updates, Fear Of Infecting Children In The Third Wave, Now Need To Be More Careful

मुख्यमंत्र्यांचा संवाद:तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती, आता जास्त सावध होण्याची गरज

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाल रोग तज्ञ टास्क फोर्सचा राज्यातील बाल रोग तज्ञांशी संवाद

देशात कोरोनाची तिसरी लाट येणार आणि त्यात लहान मुलांना अधिक धोका असणार, असे म्हटले जात आहे. लहान मुलांवरील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बाल रोगविषयक टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे. या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर्सशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालकांना धीर देत घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे म्हटले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही, पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत आहे. यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहात, मी केवळ निमित्तमात्र आहे. कोरोन विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू.

आपल्याला सावध राहण्याची गरज
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या फॅमिली डॉक्टर , ज्याला मी “ माझा डॉक्टर” असे म्हणतो त्याला वेळीच मुलाला दाखवा म्हणजे उपचार लगेच सुरु करता येतील. तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यात माझे कुटुंब, माझी जबादारी मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले

ते पुढे म्हणाले की, गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. पण, रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या. काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे.

कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाउले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवीत आहोत. लसीकरणाच्या बाबतीतही मी परत सांगतो की १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि मला झात्री आहे, जून नंतर लस पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरु करू शकू.

बातम्या आणखी आहेत...