आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे दुर्घटना:मुंबईतील कांदिवली-बोरीवली रुटवर रेल्वेची ट्रकला धडक, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले

मुंबईतील कांदिवली-बोरीवली लाइनवर आज एक मोठी रेल्वे दुर्घटना झाली. येथील बांद्रा टर्मिनस-अमृतसर ट्रेन आणि एका ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे विभागाने याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

असा झाला अपघात 

मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रक कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ एका बाजुकडून दुसऱ्या बाजूकडे जात होती. यादरम्यान ट्र्क पटरीवर अडकली. नंतर मागून येणाऱ्या बांद्रा टर्मिनस-अमृतसर मेलने ट्रकला जोरदार टक्कर मारली. सध्या यात ट्रक ड्रायव्हरची चूक असल्याचे म्हटले जात आहे, सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...