आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन वादाच्या भोवऱ्यात:कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, अॅटॉर्नी जनरलकडून अवमानना खटला चालवण्यास परवानगी

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर बुधवारी तुरुंगातून बाहेर आले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केल्याप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी अवमानना खटला सुरू करण्यास परवानगी दिली आहे. रिपब्लिक टीव्हीचे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने बुधवारी जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर कुणालने ट्विट्स क्ले होते. यावर पुण्यातील वकील रिजवान सिद्दीकी यांनी याला सुप्रीम कोर्टाचा अवमानना म्हणत कामराविरोधात कारवाईची मागणी केली होती.

कुणाल कामराचे ट्वीट्स:

अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कुणाल कामराने ट्वीट केले, 'ज्या वेगाने सर्वोच्च न्यायालयाने या राष्ट्रीय मुद्द्यावर सुनावणी केली, त्यावरून आता महात्मा गांधींच्या फोटोऐवजी हरीश साळवेंचा फोटो लावण्याची गरज आहे.'

यासोबत कुणालने अजून एक ट्वीट केले, 'डीवाय चंद्रचूड हे एखाद्या फ्लाईट अटेंडेंट प्रमाणे आहेत, ते प्रथम श्रेणीतील प्रवाशांना शॅम्पेन ऑफर करतात, कारण ते फास्ट ट्रॅक आहेत. पण, सामान्य माणसांना आपण यात बसू की नाही हे देखील माहित नाही. त्यामुळे त्यांना हे मिळण्याची शक्यताच नाही,' असे ट्वीट कुणाल कामराने केले.

अर्णब गोस्वामींच्या वाढदिवशी चप्पल गिफ्ट करण्यासाठी गेले होते

यापूर्वी कुणाल कामराने इंडिगोच्या मुंबई-दिल्ली फ्लाइटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामी यांना 'भेकड' म्हणत त्रास दिला होता. याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. या घटनेनंतर इंडिगोसह अनेक फ्लाइट्सने कामराला 6 महिने विमान प्रवासाची बंदी लावली होती. यानंतर अर्णब यांच्या वाढविवशी कुणाल आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप गोस्वामी यांच्या ऑफीसमध्ये त्यांना चप्पल भेट देण्यासाठी गेले होते. यावरुनही प्रचंड गोंधळ झाला होता.

बातम्या आणखी आहेत...