आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही काही महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही:सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले, म्हणाल्या - बेजबाबदार बोलणे बंद करा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही काही महाराष्ट्राची हास्य जत्रा नाहीये. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादे भाषण करता तेव्हा ते विचार करूनच करायला हवे, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

काय म्हणाले पाटील?

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पगारावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते, शिक्षण क्षेत्रात प्राध्यापकांची कमतरता आहे. पण तरीही धकवले जात आहे. प्राध्यापकांची कमतरता कमी व्हावी म्हणून 2072 प्राध्यापकांची भरती करत आहोत. खासगी महाविद्यालयांना मी असे म्हणेल की, तुम्ही फी कमी करा. तुमच्या प्राध्यापकांचे पगार आम्ही करतो. असे विधान त्यांनी केले होते.

निधी आहे का?

यावरुन सुप्रिया सुळेंनी त्यांना धारेवर धरले. त्या म्हणाल्या, एखादा मंत्री जेव्हा बोलत असतो, तेव्हा त्याला लाईटली घेणे, चेष्टेवारी घेणे गंमतजंमत करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. ही काही महाराष्ट्राची हास्य जत्रा नाहीये. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादे भाषण करता तेव्हा ते विचार करुनच करायला हवे. एवढा मोठा मंत्री जर असे विधान करत असेल तर त्याने त्यासाठी आधी निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर केली? पत्रकारांनी हे शक्य आहे का हे विचारल्यावर सुळेंनी शक्य-अशक्य ही गोष्ट मंत्र्यांनी बघायची आहे, कारण वक्तव्य त्यांनी केले आहे. असा टोला लगावला.

महाराष्ट्राची काळजी वाटते

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणत असेल की सर्व खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही यासाठी निधी आहे का? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का?, हिशोब केला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत ऊठसूठ महाराष्ट्रातील नेते बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राने स्वतःचा सुसंस्कृतपणा कधी सोडलेला नाही. असेही त्यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...