आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या राजकारणावर काँग्रेसचा हल्ला:सचिन सावंत म्हणाले- 'वैफल्यग्रस्त भाजप नेत्यांना मिळतो विकृत आनंद, जनतेसाठी ही मंडळी 'जोकर'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकारणावरून काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन सावंत यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपाला घेरले आहे. कोणतीही विश्वासार्हता नसणाऱ्यांना पुढे करून सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यासंदर्भात कोणाचेही नाव न घेता सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे नेते वैफल्यग्रस्त विकृती आनंद घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात सध्या राणा दाम्पत्य तसेच राज ठाकरे विरुद्ध राज्य सरकार असेच चित्र दिसून येत आहे. मात्र, कोणाचेही नाव न घेता त्यांनी आघाडी सरकारला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले सावंत
कोणतीही विश्वासार्हता नसणाऱ्यांना पुढे करुन मविआ सरकारला बदनाम करतात येईल हा भाजपाचा गैरसमज आहे.सरकार पडत नाही या भावनेने वैफल्यग्रस्त भाजपा नेत्यांना विकृत आनंद मिळत असेल दिवसभर वृत्तवाहिन्या दाखवतात त्यांना पाहून आघाडीसाठी जनतेचा पाठिंबा वाढतच आहे. जनतेसाठी ही मंडळी जोकरच आहेत.

सावंत यांचा नेमका रोख कोणाकडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत दिलेला इशारा, खासदार नवनीत राणा तसेच आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा वरून केलेले राजकारण आणि किरीट सोमय्या यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप, या सर्व पार्श्‍वभूमीवर सचिन सावंत यांनी भाजपवर केलेले आरोप पाहता त्यांचा नेमका रोख कोणाकडे आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मनसेवरही साधला निशाणा

सावंत यांनी मनसेला महाराष्ट्र दिसतो पण शेजारी कर्नाटक दिसत नाही का? असा प्रतिप्रश्न केला आहे. श्रीराम सेनेसोबत मनसेने तेथील आंदोलनात देखील सहभागी व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. याच बरोबर 'फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची हातभर का पायभर फाटली तेही स्पष्ट करावे' असे सावंत यांनी म्हटले आहे. मनसे आणि भाजप महाराष्ट्रला बदनाम करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...