आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस सज्ज:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या व्यवस्थापनाकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य स्तरीय निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली आहे.

काँग्रेसने स्थापन केलेल्या या 13 सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. तर उपाध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर आहेत. समितीच्या समन्वयकपदी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील आणि सदस्यपदी प्रदेश सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, प्रकाश मुगदिया, सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे, इब्राहिम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख, प्रदेश चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश पातळीवरील या कमिटीसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser