आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन, 23 दिवसांपासून सुरू होते उपचार

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते

काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. सातवांच्या निधनाच्या बातमीने हिंगोलीकरांनाच मोठा धक्का बसला आहे. पंचायत समिती सदस्य ते खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

राजीव सातव यांना 21 एप्रिल रोजी करोनाणी लागण झाली होती. यानंतर 23 एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरूवातीला त्यांची प्रकृती चांगली होती. पण, 25 एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. काही दिवसानंतर प्रकृतीत पुन्हा सुधारत असल्याची माहिती येऊ लागली. पण, पण अचानक प्रकृती खालवल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांच्या निधनाची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सुरजेवाला यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले “निःशब्द! आज मी असा सहकारी गमावला आहे, ज्याने सार्वजनिक जीवनातील पहिले पाऊल माझ्यासोबत युवक काँग्रेसमधून ठेवले होते आणि आजपर्यंत माझ्यासोबत चालत होते…. राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. माझ्या मित्रा अलविदा, जिथेही राहशील, झळाळत रहा.”

सातव यांचा देशपातळीवर सहभाग

राहूल ब्रिगेडचे विश्‍वासू व्यक्तीमत्व म्हणून खासदार ॲड. सातव यांच्याकडे बघितले जात होते. काँग्रेसच्या वरिष्ठांच्या बैठकीतील धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग होता. काँग्रेसच्या देशपातळीवरील बैठकांमध्ये त्यांचा सहभाग होता.

आईकडून मिळाले राजकारणाचे बाळकडू

कळमनुरी तालुक्यातील मसोड या ग्रामीण भागातील असलेले खासदार सातव यांचा राजकिय प्रवास देखील थक्क करणारा आहे. आई माजीमंत्री रजनी सातव यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या खासदार सातव यांनी पंचायत समिती सदस्यापासून राजकिय प्रवास सुरु केला.

2014 मध्ये मोदी लाटेमध्ये ते विजयी झाले

सन २००२ मध्ये मसोड पंचायत समिती गणातून निवडणुक लढवली. पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी खरवड जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. जिल्हा परिषदेत त्यांना कृषी सभापतीपद मिळाले. यापदावर काम करतांना त्यांनी शेतीत नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यास त्यांनी सुरवात केली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळाल्यानंतर त्यांनी युवकांची फळी निर्माण केली. सन २००९ मध्ये त्यांनी कळमनुरी विधानसभेेचे आमदार झाले. तसेच त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. हिंगोली लोससभा मतदार संघातून त्यांना सन २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये ते विजयी झाले. लोकसभेत मराठवाडा व विदर्भाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. सन २०२० मध्ये त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली.

हिंगोलीकर निशब्द

मागील २३ दिवसांपासून हिंगोलीकरांचे लक्ष पुणे येथील जहाँंगिर हॉस्पीटलकडे लक्ष लागले होते. त्या ठिकाणावरून काय निरोप येईल याकडे हिंगोलीकर कानटवकारून बसले होते. खासदार सातवांची प्रकृती चांगली होईल या आपेक्षेवर जनता होती. मात्र आत नियती जिंकली अन सातव कोरोना अन त्यानंतरची लढाई हरले. आज ते गेल्याचे निरोप मिळाले अन सारे हिंगोलीकर निशब्द झाले.

खासदार राजीव सातव अल्प परिचय

खासदार ॲड. राजीव शंकरराव सातव

जन्म- ता. २१ सप्टेंबर १९७४

मुळ गाव- मसोड (ता.कळमनुरी, जि. हिंगोली)

शिक्षण- बीएस्सी एमए एलएलबी (पुणे)

भुषविलेली पदे- मसोड पंचायत समिती पंचायत समिती गणाचे सदस्य, हिंगोली जिल्हा परिषद सदस्य, कळमनुरी विधानसभा आमदार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, अखील भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिंगोली लोकसभेचे खासदार, राज्यसभा सदस्य, प्रभारी गुजरात काँग्रेस.

बातम्या आणखी आहेत...