आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया:इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात गुंतवणुक कधी होणार, केंद्राचा अर्थसंकल्प सेन्सलेस; काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव यांचा आरोप

हिंगोली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राला मदत का करण्यात आली नाही, सातव यांचा सवाल

केंद्र सरकारच्या अर्थ विभागाने सादर केलेला अर्थसंकल्प पाच राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेला असून महाराष्ट्रात गुंतवणुक कधी केली जाणार असा सवाल करत केंद्राचा अर्थसंकल्प सेन्सलेस असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार ॲड. राजीव सातव यांनी केला आहे.

या संदर्भात बोलतांना खासदार सातव म्हणाले की, एकीकडे चीन देशात घुसखोरी करीत आहे. संरक्षण विभागासाठी खर्चाचे बजेट वाढविणे आवश्‍यक होते मात्र संरक्षण विभागाचे बजेट वाढविले नाही. रोजगाराच्या प्रश्‍नावरही म्हणावे तसे काहीही नाही. अर्थसंकल्पातील कामे तीन वर्षात, पाच वर्षात करणार असे सांगितले मात्र यावर्षी काय करणार हे सांगितलेच नाही. आरोग्यावर 2 लाख 38 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र हा निधी किती वर्षात खर्च केला जाणार हे सांगण्यात आलेले नाही. बंदरे खाजगीकरण करण्याचा अजेंडा या अर्थसंकल्पात आहे असून अदानी अन अंबानी यांचे भले करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात असल्याचा आरोप त्यांनी केली.

नाशिक आणि नागपूर मेट्रोबाबतचे काम सुरु आहे. मात्र बाकीच्या विकासाबाबत काय आहे. इतर राज्यांना ज्या प्रमाणे मदत केली जाते त्याच प्रमाणे महाराष्ट्राला मदत का करण्यात आली नाही. राज्यातील सन 2024 च्या विधानसभेच्या वेळी राज्याला मदत करणार का असा सवाल खासदार ॲड. सातव यांनी उपस्थित केला.