आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक:डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी; मंगळवारी अर्ज दाखल करणार

हिंगोली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी येथील डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली असून याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. डॉ. सातव मंगळवारी ता. १६ उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्या तरी हि निवड बिनविरोध होण्याचे संकेत आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाकडून सातव कुटुंबीयांचे राजकिय पुनर्वसन केले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

काँग्रेसचे माजी खासदार स्व. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी मोठे प्रयत्न केले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असतांना देशभरात युवकांची फळी तयार केली. या शिवाय गुजरात प्रभारी म्हणून काम करतांना त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्र भागातून काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. या शिवाय मोदी लाटेतही त्यांनी हिंगोली लोकसभेची जागा जिंकली होती. काँग्रेसच्या नेत्या सोनीया गांधी तसेच राहूल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांनी ओळख निर्माण झाली होती.

दरम्यान, कोविडमुळे त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षा सोबतच महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. तर सातव कुटुंबीयांवरही मोठा आघात झाला. त्यानंतर आता पुढे पक्षाकडून त्यांचे राजकिय पुनर्वसन केले जाणार काय असा प्रश्न निर्माण झाल होता. तर काँग्रेस पक्षाने स्व. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांनी प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करून त्यांचे राजकिय पुनर्वसन केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तर काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काँग्रेस पक्ष व गांधी परिवार सातव कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार शरद रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकिय तर्कवितर्क सुरु होते. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनीया गांधी यांनी या जागेसाठी डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्या नावाला सहमती दिली अन काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनीक यांनी डॉ. सातव यांच्या नावाचे पत्र काढून त्याच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे.

त्यानंतर आता मंगळवारी ता. १६ डॉ. सातव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सदर जागा काँग्रेसचीच असल्याने डॉ. सातव यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. सातव कुटुंबियांच्या राजकिय पुनर्वसनाचे स्पष्ट संकेत यातून मिळत असून त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे

बातम्या आणखी आहेत...