आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोव्यातून एक नव्हे तर दोन बाटल्या आणण्याची मुभा':सचिन सावंत यांनी करून दिली 1997 च्या परिपत्रकाची आठवण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक येताना सोबत मद्याची बाटली सोबत आणतात. गोव्यामध्ये मिळत असलेले स्वस्त मद्य महाराष्ट्र टॅक्स लागल्यामुळे महागड्या दरात खरेदी करावे लागू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. महाराष्ट्रातील अनेक पर्यटक देखील गोव्याला फिरायला गेल्यानंतर येताना मद्याच्या बाटल्या सोबत आणतात.

अशावेळी एकही मद्याची बाटली आणली तर त्या व्यक्तीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले होते. मात्र शंभूराज देसाई यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी चांगला समाचार घेतला आहे.

सचिन सावंत यांनी यांनी नेमकी काय केली टीका

'गोव्यामधून मद्याची एकही बाटली आणली तर MCOCA लावण्याच्या वल्गना करणाऱ्या सन्माननीय शुभराज देसाई यांनी राज्य शासनाचे 1997 चे परिपत्रक वाचले आहे का? गोव्यातून एक नव्हे तर दोन बाटल्या आणण्याची मुभा आहे. महाराष्ट्राचा देशात सन्मान आहे तो राखला जावा. युपी मॉडेल आणू नये ही विनंती' अशी टीका सावंत यांनी केली आहे.

काय म्हणाले होते शंभूराज देसाई
महाराष्ट्रात गोव्यातून बनावट दारू अन्नांवर यापुढे मुक्कांतर्गत कारवाई केली जाणार आहे तीन वेळा अशा प्रकरणात दोशी आढळल्यास ही कारवाई केली जाईल गोव्यातून अवैधरित्या केल्या जाणाऱ्या मध्याच्या वाहतुकीला जात बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले होते.

सावंत यांनी आधीही केली होती टीका
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शंभूराज देसाई यांच्या निर्णयावर या आधी देखील टीका केली होती. सचिन सावंत यांना मकोका काय आहे? हे तरी माहिती आहे का? असे म्हणत शंभूराज देसाई यांच्या निर्णयावर डिचवण्याचा प्रयत्न केला होता. यावर देसाई यांनी सचिन सावंत यांना उत्तर देताना दारूची तस्करी हे गैर कृत्य आहे, त्याचे सचिन सावंत समर्थन करत आहेत का? असा सवाल विचारला होता.

बातम्या आणखी आहेत...