आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:बनावट नोटा प्रकरणाचे विदर्भातही कनेक्शन; पुसद येथून दोघांना अटक, आणखी बडे मासे हाती लागण्याची शक्यता

हिंगोली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन वर्षांपासून विदर्भातही बनावट नोटा चलनात आणल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट

हिंगोली शहरालगत आनंदनगर भागातील बनावट नोटा प्रकरणात एटीएसने विदर्भातील पुसद येथून गुरुवारी पहाटे आणखी दोघांना अटक केली. त्यांनी तीन वर्षांपासून विदर्भातही बनावट नोटा चलनात आणल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट होत आहे.

बनावट नोटा छापणाऱ्या संतोष सूर्यवंशी (देशमुख) व छाया भुक्तार यांची चौकशी सुरू आहे. त्यात पुसद येथील दोघे जण त्याच्यासोबत काम करीत असल्याची माहिती पुढे आली. त्यावरून पाेलिसांनी बुधवारी मध्यरात्री पुसद येथे जाऊन शोधमोहीम सुरू केली. पहाटेच्या सुमारास शेख इम्रान व विजय कुरुडे (रा. पुसद) यांना अटक केली.

दरम्यान, वरील दोघेही संतोष सूर्यवंशी (देशमुख) याच्या मागील तीन वर्षांपासून संपर्कात होते. ते बनावट नोटा घेऊन विदर्भात चलनामध्ये आणत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुसद येथे आणखी काही जणांना नोटा दिल्या काय, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. यामध्ये आणखी काही जण सहभागी असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत.

पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप
हिंगोलीच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड केला. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी उपाधीक्षक रामेश्वर वैजने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार रूपेश धाबे, महेश बंडे, अर्जुन पडघन, विजय घुगे यांचा शुक्रवारी प्रशस्तिपत्र व रोख पारितोषिक गाैरव केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser