आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Construction Minister Ashok Chavan's Dream Of Diverting Kayadhu's Water To Nanded Will Not Be Fulfilled, Says Former MP Adv. Shivaji Mane

हिंगोली:कयाधूचे पाणी नांदेडकडे वळवण्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाणांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांचा इशारा

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाणी नेण्याचा घाट घातल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल

हिंगोली जिल्हयाची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात घेऊन हे पाणी नांदेडला नेण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांचे स्वप्न आहे. हे कधीही पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांनी रविवारी ता. २७ दिव्य मराठीशी बोलतांना दिला आहे.

हिंगोली जिल्हयाचा सिंचनाचा अनुशेष अद्यापही शिल्लक आहे. जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्यासह लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात कयाधूनदीवर बंधारे बांधणे व इतर जलसंधारणाची कामे करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न केले जात आहेत.

मात्र आज नांदेड येथे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पावर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात आणण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली आहे. तर जलसंपदामंत्री पाटील यांनीहा या प्रस्तावावर मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.

यावर प्रतिक्रिया देतांना माजी खासदार ॲड. माने म्हणाले की, हिंगोली जिल्हयाचा अनुशेष शिल्लक आहे. मात्र आता हिंगोली जवळील खरबी येथे बंधारा बांधून त्याठिकाणावरून कालव्याद्वारे पाणी इसापूर धरणात नेले जाणार आहे. तर इसापूरचे पाणी नांदेडकडे नेले जाणार आहे. हिंगोलीकरांच्या हक्काचे पाणी नांदेडकडे नेले जाणार असल्याने हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट होणार असून जिल्हयातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्या शिवाय पर्याय राहणार नाही.

कयाधूचे पाणी नांदेडकडे वळवण्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे स्वप्न कदापिही पूर्ण होऊ देणार नाही. मात्र त्यानंतरही पाणी नेण्याचा घाट घातल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा अॅड. माने यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...