आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सिजन प्लँट:मराठवाड्यात ऑक्सिजन प्लँटची उभारणी संथ गतीने, हवेतून तयार होणाऱ्या ऑक्सिजनचे 36, लिक्विडचे 22 बाकी

हिंगाेली / मंगेश शेवाळकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन प्लँट उभारणीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना असताना हवेतून तयार होणाऱ्या ऑक्सिजनचे ३६, तर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे २२ प्लँट उभारणीचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे पुढील काळात रुग्णांची संख्या वाढल्यास ऑक्सिजनअभावी अडचणी भासण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात सध्या कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या भीती सोबतच ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील दोन दिवसांत राज्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग सुरू झाल्याचे वाढीव रुग्णांवरून दिसू लागले आहे. मराठवाड्यात कोविडच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असून रुग्णांना तातडीची गरज भासल्यास ऑक्सिजनची उपलब्धता होणे आवश्यक आहे. त्यानुसार कोविडच्या दुसऱ्या लाटेपेक्षा किमान ४० टक्के ऑक्सिजन साठा उपलब्ध करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ऑक्सिजन प्लँटदेखील मंजूर करण्यात आले आहेत.

मात्र, सध्याच्या स्थितीत मराठवाड्यात हवेतून ऑक्सिजन तयार करणारे ११५ प्लँट मंजूर करण्यात आले असून त्यातून १०६.४१ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. सध्या ७९ प्लँट उभारणीचे काम पूर्ण झाले आहेत. ३६ प्लँट उभारणीचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय लिक्विड ऑक्सिजनचे ८६ प्लँट मंजूर असून त्यापैकी ६४ प्लँटचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून ९२७.४९ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असून २२ प्लँटचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...