आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर दहेगाव:करंजगावजवळ कंटेनरचा अपघात; जमावाने पळवले बिअरचे 1,650 बॉक्स

बोर दहेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करंजगावजवळ बिअरच्या ट्रकचा अपघात झाला. या वेळी परिसरातील लोक व महामार्गावरील प्रवाशांनी बिअरचे बॉक्स नेले. छाया : बाबासाहेब वाघ

वैजापूर तालुक्यातील करंजगावजवळ नागपूर-मुंबई महामार्गावर रविवारी रात्री ९ वाजता वाळूज येथून मुंबईकडे जाणाऱ्या बिअरने भरलेल्या कंटेनरला (एमएच ४६ बीएफ ५१२) समोरून येणारा ट्रक घासून गेल्यामुळे कंटेनरचा एक बाजूचा पत्रा पूर्णपणे फाटल्यामुळे कंटेनरमधील १८०० काचबर्ग कंपनीचे बिअरचे बॉक्स महामार्गावर पसरले आणि काही क्षणातच करंजगाव परिसरातील लोकांनी आणि महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी बिअरचे बाॅक्सच पळवले.

काही वेळेतच बिअरचा पूर्ण कंटेनर रिकामा झाला. येणारा प्रत्येक जण गाडीतील बिअर बॉक्स लुटत होता. अपघातग्रस्त कंटेनरचालकला वाचवण्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. परंतु, प्रत्येकवेळी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून येणारे श्रीमंत गोर्डे व त्यांचे सहकारी रवींद्र मोकळे, सतीश मगर यांनी मदत केली व त्याच्यावर प्रथमोपचर केले.

घटनास्थळी वैजापूर पोलिस ठाण्याचे सपाेनि केळे, जमादार दिलीप वेलगाेडे, जमादार किशाेर अाघाडे आणि गणेश पठारे दाखल झाले अाणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली. पाेलिस येइपर्यंत १८०० पैकी फक्त १५० बॉक्स शिल्लक होते.

बातम्या आणखी आहेत...