आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Corona | Hingoli | Covid19 Update | Be Vigilant In Treating Corona Patients; Collector Jitendra Papalkar's Notice To The Health Department

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा:कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सतर्क राहा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आरोग्य विभागाला सुचना

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हयातील कोविड रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळावे पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत आरोग्य सेवेत निष्काळजीपणा करू नका. अशा स्पष्ट सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. राज्यात कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यानुसार रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.

हिंगोली जिल्हयातही मागील दोन दिवसांत दोन रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभुमीवर पापळकर यांनी यंत्रणांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. मंगेश टेहरे यांची उपस्थिती होती.

त्यानंतर पापळकर व दैने यांनी शासकिय रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. संभाव्या तिसऱ्या लाटेत रुग्ण वाढल्यानंतर काय नियोजन केले याची माहिती घेतली. यावेळी त्यांनी रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्याच्या सुचना दिल्या.

तसेच फायर व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यास वेळेत उपचार मिळायला हवेत, कुठल्याही परिस्थितीत निष्काळजीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...