आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर कोरोना:जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या कोरोना बाधित मातेचे निधन

अहमदनगरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • महिलेला सीझरियन प्रसूती झाली होती

नगर जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा आज (दि.29) सकाळी 8:45 वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेचे काल सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत ठीक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला सीझरियन प्रसूती झाल्यानंतर आयसियूमध्ये ठेवण्यात आले होते. कोरोना बाधीत असलेल्या या महिलेला न्यूमॅटिक लक्षणे होती, असे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले. महिला मुंबईहून निंबलक येथे आली होती. त्यानंतर तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.

बातम्या आणखी आहेत...