आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाशिम:वाशिममध्ये कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू, जिल्ह्यातील मृतांचा आकडा 2 वर

वाशिमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वाशिम जिल्ह्यातील कवठळ येथील 62 वर्षीय वृद्ध दिनांक 8 मे रोजी जिल्ह्यात उपचारार्थ दाखल झाले होते. त्या कोरोना बाधित रुग्णाचा 29 मे रोजी सकाळच्या सुमारास सेवाग्राम रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली जात आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथील रहिवासी असलेले 62 वर्षीय वृद्ध हे कारंजा येथील खाजगी रुग्णालयात 4 मे रोजी दाखल झाले होते. तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे अकोला येथील सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन गावी परतल्यावर 8 मे रोजी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. मेंदूतील काही भागात रक्त पुरवठा खंडित झाल्याचे दिसून आल्यामुळे त्वरीत उपचार करणे सुरु करण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे दिसून येताच स्त्राव तपासणी करिता पाठविला असता, या वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील दोन मुले, सासू, वाहन चालक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह 31 जणांचे स्त्राव तपासणी करिता पाठविले. यातील 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 29 मे रोजी सकाळच्या सुमारास कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. जिल्ह्यात मृतक महिलेचा तर वाशिम जिल्ह्यातील वृद्धाचा समावेश करण्यात आला असून, कोरोना बाधितांची मृत्यूची संख्या दोन झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...