आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वर्धा:प्रसूती झालेल्या कोरोनाग्रस्त महिलेला स्वतःच करावे लागतात काम, सेवाग्राम रुग्णालयातील प्रकार उघडकीस : विभागाचे दुर्लक्ष

वर्धा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्णालयात गर्भवती महिलेला तिची कामे स्वतःलाच करावी लागत असल्याचा प्रकार अकोला येथे उघडीस आला आहे. अकोला येथील महिला गर्भवती असल्यामुळे ती हनुमान नगर बोरगाव मेघे येथे माहेरी आली होती.रुग्णालयात उपचारासाठी दाखल होताच तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे तिला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्या महिलेला स्वतःचे काम स्वतःच करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

अकोला शहरातील २७ वर्षीय महिला प्रसूती करिता हनुमान नगर बोरगाव मेघे येथे (दि. १०) जुलै रोजी माहेरी आली होती. ११ जुलै रोजी ती कोरोना बाधीत असल्यामुळे त्या महिलेला वर्धा शहरा जवळ असलेल्या सेवाग्राम येथे बा आणि बापूंनी स्थापन केलेल्या कस्तुरबा रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले होते. २७ वर्षीय महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला कोरोना कक्षात घेऊन जाण्यात आले होते.

घरातील महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला रुग्णालयातील कुठल्याही प्रकारची कामे करण्यास सक्त मनाई केली जाते. मात्र महिलेला रुग्णालयातील बेडवरील चादर बदलविण्यासाठी तसेच इतर काम करण्यासाठी तिथे परिचारिका उपस्थित नसल्यामुळे तिने दोन दिवसीय बाळाला कोरोना कक्षात दाखल असलेल्या महिलेजवळ देऊन त्या महिलेने स्वतःच काम केले असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.

बा आणि बापूंनी सेवाग्राम येथे कस्तुरबा रुग्णालयाची स्थापना केली होती. गोर-गरिबांना अल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी याकरिता रुग्णालयाची उभारणी १९४५ ला स्व. डॉ सुशीला नायर यांनी केली होती.या रुग्णालयाचे जगभरात  नावलौकिक झाले असल्याने अनेक राज्यांमधून रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येत आहे.स्व डॉ सुशीला नायर यांच्या निधनानंतर रुग्णालयाची जबाबदारी धीरूभाई मेहता यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मुंबई येथून रुग्णालयाचे सूत्र चालविणारे मेहता वर्षांमधून एकदा पाहणी करण्यासाठी येत असतात.

येथील रुग्णांना मृत्यूच्या दारात उभे करणारे डॉ कलांत्री फक्त रुग्णांजवळून पैसे उकळण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत असल्यामुळे येथील भोंगळ कारभार चहाट्यावर आला आहेत.केंद्र सरकारने कोविड करिता या रुग्णालयाला मान्यता दिली असल्यामुळे रुग्णांना स्वतःचे काम स्वतःच करावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सेवाग्राम रुग्णालयातील घडलेल्या प्रकारा संबंधित माहिती घेण्यासाठी सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नितीन गगणे यांच्याशी संपर्क साधला असता,संपर्क होवू शकला नाही.

यावर कुठलेही भाष्य नको; बोलण्यास दिला नकार

सेवाग्राम येथील कोरोना बाधीत महिलेसोबत घडलेल्या प्रकारा संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांना माहिती विचारण्यात आले असता,यावर कुठल्याही प्रकारचे भाष्य करणार नसल्याचे सांगत, बोलण्यास नकार दिला आहे.