आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून दररोज नवीन संक्रमितांचा आकडा अडीच हजारांच्या पुढे येत आहे. राज्यात आज(दि.28) 2,598 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 59 हजार 546 झाला आहे. तसेच, आज राज्यात 85 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 1,982 झाली आहे.
महाराष्ट्रातून आतापर्यंत 696 ट्रेन्समधून 10 लाखांपेक्षा जास्त प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहे. तर, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए) वरुन मागील 3 दिवसात 14 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. यादरम्यान, कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेने कोपरखैरणे आणि तुर्भे परिसरात मोठ्या प्रमाणावर स्पेशल मास स्क्रीनिंग सुरू केली आहे. या दोन्ही भागात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आणि चाळी आहेत. या परिसरातून मागील काही दिवसांत अनेक संक्रमित सापडले आहेत.
सर्वात जास्त 374 ट्रेन्स यूपीला पाठवण्यात आल्या
लॉकडाउनदरम्यान महाराष्ट्रातून आतापर्यंत 696 श्रमिक विशेष ट्रेन्समधून 9.82 लाख मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहे. राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. यात उत्तर प्रदेशासाठी सर्वात जास्त 374 ट्रेन्स पाठवण्यात आल्या, तर बिहारसाठी 169, मध्यप्रदेशसाठी 33, झारखंडसाठी 30, कर्नाटकसाठी 6 आणि ओडिशासाठी 13 ,राजस्थान 15, पश्चिम बंगाल 33 आणि छत्तीसगडसाठी 6 ट्रेन्स चालवण्यात आल्या.
बुधवारी 25 फ्लाइट आल्या आणि गेल्या
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए)वरुन मागील 3 दिवसात 14 हजार 69 प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईच्या एअरपोर्टची जबाबदारी सांभाळणाऱ्या जीवीके मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. (एमआईएएल)नुसार, बुधवारी 25 फ्लाइट आल्या. तर, इतक्याच 25 फ्लाइटने उड्डाण घेतल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.