आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात आज कोरोना संक्रमितांचा आकडा 18 हजारांच्या पुढे गेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, आज राज्यात 1,362 नवीन रुग्ण सापडले आहेत. यानंतर राज्यातील आकडा 18,120 झाला आहे.
मुंबईतील आर्थर रोड जेलमधील 72 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कैद्यांशिवाय तुरुंगातील 7 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील धारावीमध्ये कोरोना व्हायरसचे नवीन 50 रुग्ण समोर आले आहेत. यानंतर परिसरातील एकूण संख्या 783 झाली आहे.
मजुरांना मेडिकल सर्टिफीकेटची गरज नाही
टोपे म्हणाले की, ''प्रवासी मजुरांना घरी जाण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांची फक्त थर्मल स्क्रीनिंग केली जाईल. डॉक्टरांच्या क्लीनिकबाहेर वाढत असलेल्या रांगा पाहता, हा निर्णय घेण्यात आला आहे.''
छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर
राज्यात सुरू असलेल्या कोरोना संकटनादरम्यान कॅबिनेड मंत्री छगन भुजबल यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. खाद्य आणि नागरि मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवार म्हटले की, महाराष्ट्रातून मजुर निघून जाणे, अशोभनीय आहे. यामुळे मन सुन्न होत आहे. पुढे ते म्हणाले की, सरकारच्या विरोधाभाषी आदेशामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम तयार होत आहे.
उद्धव ठाकरेंनी बोलवली सर्वपक्षीय बैठक
गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. यात ठाकरे व्हिडिओद्वारे सहभागी झाली होते. बैठकीत उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, राज ठाकरेसह अनेक नेते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.