आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Corona Outbreak In Mahastra Updates: In State Across Over 61,000 New Patients; Vacciantion News And Live Updates

कोरोना राज्यात:राज्यभरात 61 हजारांवर नवे रुग्ण; 19 हजार विदर्भ-मराठवाड्यातील; राज्यात 349, विदर्भात सर्वाधिक 168 रुग्णांचा मृत्यू

मुंबई/ अमरावती9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भात कोरोनामुळे १६८ मृत्यू; दिवसभरात १२,२१२ नवे रुग्ण

महाराष्ट्रात गुरुवारी ६१ हजार ६९५ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. यातील सुमारे १९ हजार एकट्या विदर्भ-मराठवाड्यातील आहेत. राज्यात गेल्या चोवीस तासांत झालेल्या ३४९ मृत्यूंपैकी २५९ या दोन विभागांतील आहेत. एकट्या विदर्भात १६८ मृत्यू झाले आहेत.

विदर्भात कोरोनामुळे १६८ मृत्यू; दिवसभरात १२,२१२ नवे रुग्ण
विदर्भात कोरोनामुळे गुरुवारी तब्बल १६८ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हजार २१२ नवे रुग्ण आढळले. मृतांत पूर्व विदर्भातील १२१ जणांमध्ये नागपूरच्या ७४, भंडारा २२, चंद्रपूर १६, तर गोंदिया जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे. पश्चिम विदर्भात कोरोनामुळे ४७ जणांचा मृत्यू झाला. यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २२, अमरावतीमध्ये १०, अकोला ७, वाशीम ५, तर बुलडाणा जिल्ह्यातील ३ जणांचा समावेश आहे. नागपूर विभागात गुरुवारी ९३२३, तर अमरावती विभागात २८८९ नवे रुग्ण आढळले. विदर्भातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख २९ हजार ९५५ वर पोहोचली, तर मृतांची एकूण संख्या १० हजार ५६० झाली. आतापर्यंत ५ लाख ४ हजार ९७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर गुरुवारी ८८१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

यवतमाळमध्ये सर्वाधिक रुग्ण

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ९३४ नवे रुग्ण आढळले, बुलडाणा ७३४, अमरावती ५३४, वाशीम ३८४, तर अकोला जिल्ह्यात ३३१ नवे रुग्ण आढळले. अातापर्यंत विभागात एकूण २६३९ बाधितांचा मृत्यू झाला, तर एकूण बाधितांची संख्या १ लाख ९३ हजार ४१६ झाली. तसेच १ लाख ६९९८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. विदर्भातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी ८०.१६ एवढी आहे.

मराठवाड्यात ६८९२ पॉझिटिव्ह, ९१ मृत्यू
मराठवाड्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. गुरुवारी उस्मानाबाद वगळता ६८९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ९१ जणांचा मृत्यू झाला. ४९९२ जणांची रुग्णालयातून सुटी झाली. सध्या उस्मानाबाद वगळून ६० हजार ३९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांची आकडेवारी पुढीलप्रमाणे, कंसात मृतांचा आकडा : औरंगाबाद १३२९ (२३), जालना ७०२ (१०), परभणी ६७६ (१२), हिंगोली २७१ (४), नांदेड १२८८ (१९), लातूर १६६३ (१८), बीड ९६३ (५).

  • औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४,५८३, तर मृतांचा आकडा २०७५ वर गेला आहे. जिल्ह्यात सध्या १५ हजार ७९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...