आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद कोरोना:जिल्ह्यात आढळला कोरोना रुग्ण; आईसह पत्नी आणि भाची क्वारेंटाईन

उस्मानाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • तरुण भाजीपाला, फळांची विक्री करण्यासाठी पुणे तसेच मुंबईला जाऊन आला होता

कोरोना रुग्ण नसल्याने ग्रीन झोनमध्ये आलेल्या व त्यामुळे आठवड्यापासून लॉकडाऊनमध्ये सवलत घेऊ लागलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात 36 दिवसानंतर म्हणजे 4 एप्रिलनंतर सोमवारी (दि.11) नवीन एक रुग्ण आढळून आला आहे. परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील 30 वर्षीय तरुणाला काेरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सायंकाळी निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर परंड्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, त्याच्या नात्यातील तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

2 व 5 एप्रिल रोजी उमरगा व लोहारा तालुक्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.हे रुग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर जिल्ह्यात सहाशेवर संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले. मात्र, एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. मात्र, सोमवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टनुसार परंडा तालुक्यातील सरणवाडी येथील एका 30 वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. सदरील तरुण भाजीपाला तसेच फळांचा व्यापार करत असून, तो भाजीपाला, फळांची विक्री करण्यासाठी पुणे तसेच मुंबईला जाऊन आला होता.

4 दिवसांपूर्वी तो गावात आल्यानंतर त्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याने परंडा तालुक्यातील आसू प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. त्यानंतर त्रास वाढतच गेल्याने रविवारी त्याचा स्वॅब घेण्यात आला. सोमवारी सायंकाळी लातूर येथील प्रयोगशाळेतून सदरील स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तरुणाला तातडीने परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला आयसोलेट करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे यांनी सांगितले. दरम्यान, 36 दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा काेरोनाचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

आईसह पत्नी, भाची क्वारंटाईन

तरुणाच्या संपर्कात आलेल्या आईसह त्याची पत्नी आणि भाचीला क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, सरणवाडी हे 300 कुटंुबसंख्या असलेले गाव असून, संपूर्ण गावात सर्व्हे करण्यात येणार आहे. गावात येणारे रस्तेही बंद करण्यात येणार आहेत. नागरिकांनी गाफील राहू नये, स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...