आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात:मंत्री एकनाथ शिंदेंना कोरोनाची लागण, खासदार अरविंद सावंतही कोरोना पॉझिटिव्ह; दोघांकडूनही संपर्कातील आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा संसर्ग सध्या वेगाने पसरायला सुरुवात झाली आहे. यावेळी मंत्री, आमदार आणि खासदारांना कोरोनाचा संसर्ग होताना दिसून येत आहे. आता राज्यातील आणखी एक मंत्री आणि खासदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून शिवसेनचे खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत म्हटले, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी."

खासदार अरविंद सावंतही कोरोना पॉझिटिव्ह

खासदार अरविंद सावंत यांनीही आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, "माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!"

दरम्यान, सोमावारी सकाळीच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...