आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट्स:मुंबईत 24 तासांमध्ये 6,347 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर दिल्लीत 2716 नव्या रुग्णांची नोंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने पसरत आहेत. सगळ्यात जास्त चिंता मुंबईची आहे. येथे शनिवारी पुन्हा एकदा 6,347 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 5,712 लक्षणे नसलेली प्रकरणे आहेत. आज एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे, तर 451 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात 22,334 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत 75 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

दिल्लीत 2,716 रुग्णांची नोंद
दिल्लीत शनिवारी 2,716 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. येथे आदल्या दिवशी एका दिवसात 51% रुग्ण वाढले होते. राजधानीमध्ये पॉझिटिव्हिटी रेटममध्ये 3.64% ची वाढ नोंदवली. राज्यात सध्या 6,360 सक्रिय रुग्ण आहेत.

लॉकडाऊनचा विचार नाही, पण निर्बंध वाढणार- राजेश टोपे
रुग्ण वाढत असले तरी सध्या राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाही. लॉकडाऊनबाबात अद्याप चर्चा झालेली नाही. यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार नाही. मात्र, उपाययोजना म्हणून निर्बंध वाढवणार येणार आहे. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना अपडेट्स...
2021 च्या शेवटच्या दिवशी देशात कोरोनाची 22,775 प्रकरणे नोंदवली गेली आणि संसर्गामुळे 406 मृत्यू झाले. 24 तासात देशातील कोरोना रुग्णांमध्ये 36% वाढ झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1.04 लाख आहे. देशात गेल्या 4 दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी देशात 6,242 नवीन रुग्ण आढळले होते. शुक्रवारी प्रकरणे 3.6 पट वाढली.

विधानसभा अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील 10 मंत्री, 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राज्यात असेच कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास कडक निर्बंध लादले जातील, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांनी स्वतःच याला दुजोरा दिला आहे. याआधी गुरुवारी राज्याचे आणखी एक मंत्री बाळासाहेब थोरात हे कोरोना पॉझिटिव्ह आले.

बातम्या आणखी आहेत...