आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमायक्रॉन-कोरोना पसरतोय:महाराष्ट्रात ओमयाक्रॉन रुग्णांचा आकडा 500 पार, तर कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ; एकट्या मुंबईत 8036 नव्या रुग्णांची नोंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात रविवारी ओमयाक्रॉन व्हेरिएंटचे 50 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह महाराष्ट्रात ओमयाक्रॉन बाधितांची एकूण संख्या 500 च्या पार गेली आहे. आता देशातील ओमयाक्रॉनचे एकूण प्रकरणे 1698 झाले आहेत. त्यापैकी 580 लोक बरे झाले आहेत.

राज्यभरात 11,877 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 8036 प्रकरणे एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत नवीन प्रकरणांमध्ये 27% वाढ झाली आहे. शनिवारी येथे 6347 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

50 ओमायक्रॉन रुग्णांपैकी 36 रुग्ण पुण्यातील आहेत, तर पिंपरी चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 2, सांगली 2 आणि मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी 1 आहे. राज्यात आता 510 ओमयाक्रॉन रुग्ण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होत असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट राज्यावर आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. मात्र तरीही रुग्ण संख्या वाढत आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी काय तयारी केली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी राज्य सरकारने केलेल्या तयारीची पूर्ण माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...