आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Corona Update : Wardhakar Welcomes All Hard Working People In Curfew, There Is No Corona Patient In Wardha District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृतज्ञता:संचारबंदीत अथक परिश्रम करणाऱ्यांचे वर्धेकरांकडून स्वागत, वर्धा जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत सहकार्य केल्यामुळे वर्धा कोरोना मुक्त जिल्हा ठरला

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संचारबंदी लागू करण्यात आली होती. 29 दिवस अथक परिश्रम करणाऱ्या पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाचे वर्धेकरांकडून फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा हाहा:कार लक्षात घेता जिल्ह्यात दिनांक 16 मार्च रोजी संचारबंदी लागू करण्यात आली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठीक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. गर्दीचे ठिकाणे टाळावे या करिता वर्धेतील नागरिकांना हात जोडून विनंती करण्यात येत होती.नागरिक ऐकण्याच्या भूमिकेत नसल्यामुळे त्यांना विणाकारण लांठीचा मार्ग घ्यावा लागला. त्याच बरोबर दंड ही द्यावा लागला. जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नसल्यामुळे पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने मोकळा श्वास घेतला आहे.त्यांनी जिल्ह्याची सुरक्षा व्यवस्था हाताळत चोख कामगिरी बजावली आहे. त्याच बरोबर सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत सहकार्य केले असल्यामुळे हा जिल्हा कोरोना मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्वत्र ठिकाणी पायदळ मार्च काढण्यात आला असता, वर्धेतील नागरिकांनी पोलीस  विभागातील अधिकारी व कर्मचारी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत टाळ्यांचा कडकडाट सुद्धा करण्यात आला.यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे ,तहसीलदार प्रिती डुडुलकर ,नगर परिषद मुख्याधिकारी प्रदीप जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस निरीक्षक धनाजी जळक व पोलीस विभागाचे पोलीस कर्मचारी व जिल्हा प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...