आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सपोज:एकाच शहरातील दोन विभागांनी जारी केलेल्या रुग्ण, मृत्यूच्या आकडेवारीत मोठी तफावत

औरंगाबाद (महेश जोशी, एसआयटी)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णसंख्या, मृत्यूच्या आकडेवारीची लपवालपवी की बनवाबनवी?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यामागे कमी चाचण्या हे कारण देतानाच पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी चुकीची असल्याचा आरोप केला. याची शहानिशा करताना केलेल्या पाहणीत जिल्हा प्रशासन आणि राज्याचे आरोग्य खाते सांगत असलेल्या रुग्णांच्या आणि मृत्यूच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या आकडेवारीच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा प्रशासन १४८२ रुग्ण आणि १३९ मृत्यू कमी दाखवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संसर्ग रोखण्यासाठी ११ मार्चपासून औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या घटत असल्याचा पालिका व जिल्हा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, हे दावे आरोग्य खात्याने खोडून काढले आहेत. रोज जिल्हा प्रशासन व राज्याचा आरोग्य विभाग आकडेवारी जाहीर करतो. यात प्रचंड तफावत जाणवते.

पाठ थोपटली, पण... : औरंगाबादेत २७ एप्रिलला रुग्णसंख्या कमी झाल्याचे सांगत पालिका प्रशासकांनी पाठ थाेपटून घेतली. मात्र, याच दिवशी आरोग्य खात्याच्या अहवालात १४६८ रुग्ण व आतापर्यंतचे एका दिवसातील विक्रमी १६२ मृत्यू दाखवण्यात आले आहेत. ही तफावत रोज जाणवते.

राज्याकडून येते तीच आकडेवारी खरी
आम्ही पाठवलेल्या आकडेवारीवरून आरोग्य खाते अहवाल तयार करतात. आमच्याकडून माहिती दिल्याशिवाय राज्य ती फायनल करत नाही. त्यामुळे राज्याची आकडेवारी अधिकृत आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे देतात तीच अधिकृत समजायची. - डॉ.स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक, औरंगाबाद विभाग

बातम्या आणखी आहेत...