आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Corona Vaccination News And Updates; It Is Not Right To Declare Only For The Sake Of Credit, Balasaheb Thoranta Slammed The NCP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीला काँग्रेसचा टोला:फक्त श्रेयवादासाठी घोषणा करणे योग्य नाही, बाळासाहेब थोरांताचा राष्ट्रवादीला टोला

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या मोफत लसीकरणाच्या घोषणेवरुन थोरातांचा टोला

केंद्र सरकारने 1 मेपासून देशभरातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यानंतर देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र मोफत लसीकरणाची घोषणा केली. यावरुन काँग्रेसने नाराजी जाहीर केली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसही मोफत लसीकरणासाठी आग्रही आहे. या संदर्भातील निर्णय निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा. फक्त श्रेयवादासाठी घोषणा करणे योग्य नाही, असा टोला थोरात यांनी राष्ट्रवादीला लगावला. पुढे ते म्हणाले की, मोफत लसीकरणाबाबत आग्रह धरणे आमचे काम आहे. पण, निर्णय मात्र मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केला पाहिजे. अद्याप या विषयी मंत्रिमंडळात चर्चा सुरु आहे. पण त्यापूर्वीच श्रेय घेण्यासाठी निर्णय जाहीर करणे योग्य नाही',असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...