आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीकरण:राज्यात सायंकाळी 7 पर्यंत 14 हजार 883 कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण पूर्ण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आज 274 केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंत 14 हजार 883 (52.68 टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत लसीकरण सुरु होते. लस घेतल्यानंतर गंभीर प्रतिकुल परिणाम झाल्याची घटना झाली नसून उद्या देखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात शनिवारी 34 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरणाचे सत्र सुरु झाले असून कोविन पोर्टलवर 17 हजार 762 व्हॅक्सीनेटर्स आणि 7 लाख 85 हजार 927 आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली.

सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (181), अमरावती (239), बुलढाणा (359), वाशीम (212), यवतमाळ (289), औरंगाबाद (335), हिंगोली (120), जालना (231), परभणी (229), कोल्हापूर (545), रत्नागिरी (245), सांगली (432), सिंधुदूर्ग (161), बीड (142), लातूर (221), नांदेड (276), उस्मानाबाद (238), मुंबई (595), मुंबई उपनगर (1002), भंडारा (206), चंद्रपूर (399), गडचिरोली (187), गोंदिया (144), नागपूर (656), वर्धा (386 टक्के), अहमदनगर (650), धुळे (313), जळगाव (397), नंदुरबार (285), नाशिक (710), पुणे (1403), सातारा (511), सोलापूर (681), पालघर (319), ठाणे (1434), रायगड (150)

बातम्या आणखी आहेत...