आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Corona Vaccine, Serum Institute News And Updates ; Serum Institute's First Stock Of 1,39,500 Doses Of Covishield Vaccine Arrives In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर प्रतिक्षा संपली:सीरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' लसीचा 1,39,500 डोसचा पहिला साठा मुंबईत दाखल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. - Divya Marathi
महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती.
  • लसीची पहिली खेप देशातील 13 शहरांत दाखल

ड्रग कंट्रोलर जनरलकडून आपत्कालिन वापरासाठी मंजुरी मिळाल्यानंतर येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीचे डोस वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचे मोठ्या स्तरावर सुरू करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे याचा पहिला साठा मुंबईमध्ये दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. कोरोनाबाबत येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 शहरांमध्ये लस पाठवण्यात आल्या आहेत. सीरमच्या लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल झाला आहे. महानगरपालिकेच्या वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आली. याबाबत मुंबई महापालिकेने सांगितले की, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे दिनांक 16 जानेवारीपासून लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.

लसीची पहिली खेप देशातील 13 शहरांत दाखल

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील कारखान्यातून ‘कोविशील्ड’ लसीची पहिली खेप देशातील 13 शहरांत पोहोचली आहे. तेथून राज्य सरकारांच्या मदतीने लसीकरण केंद्रांपर्यंत लस पोहोचवली जाईल. देशात कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होत आहे. एअर इंडिया, स्पाइसजेट, इंडिगोच्या विशेष विमानांनी ‘कोविशील्ड’चे 56.5 लाख डोस पुण्याहून रवाना झाले. ही लस दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनऊ व चंदीगड येथे पोहोचवण्यात आली. लस घेऊन जाणारे पहिले विमान सकाळी 8 वाजता पुण्याहून दिल्लीला रवाना झाले. तत्पूर्वी, पुण्यात 3 विशेष ट्रकद्वारे लसीची पहिली खेप काढण्यात आली. त्यात लसीचे 34 बॉक्स ठेवण्यात आले.

आधी शेजारी देशांना, नंतर खुल्या बाजारात

कोरोना लस देशातील वापरानंतर शेजारी देशांना दिली जाईल. त्यात बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार व अफगाणिस्तानचे नाव आहे. मात्र पाकिस्तानचा उल्लेख नाही. नेपाळने 1.2 कोटी व बांगलादेशने 3 कोटी डोसचा पुरवठा करण्याचा आग्रह धरला आहे. यानंतर कोरोना लस खुल्या बाजारात आणण्याची परवानगी भारत सरकार देऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...